ठाणे : दैनंदिन कामाचा भाग म्हणून प्रवास करुन आगारात आलेल्या गाडीची सफाई कर्मचाऱ्याकडून साफसफाई केली जाते ..ठाणे आगार क्रमांक २ येथील सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड सदर गाडीची सफाई करत असताना गाडीत मिलिंद साळवी या प्रवाशाचे पैशाचे पाकीट पडल्याचे आढळले ..सदर पाकिटात ३ ते ४ हजाराची रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती . मिलिंद साळवी यांचे पैशाचे पाकीट सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांनी त्यांना संपर्क करून परत केले आहे.
सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. सदर प्रवाशाने याबाबत सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांचे व लाल परीबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तीन ते चार हजार ही काही फार मोठी रक्कम नाही पण एसटी तील कर्मचाऱ्यांचा पगार पहाता … सफाई कर्मचाऱ्यांसाठी तीन ते चार हजार रुपये ही मोठी रक्कम आहे.
मोतीलाल राठोड पाकीटातील पैसे सहजपणे ठेऊ शकले असते. पण त्यांनी या मोहाला बळी न पडता एसटी चा कर्मचारी प्रामाणिक आहे याची प्रचिती देऊन जनमानसात लालपरीची प्रतीमा उंचावण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे
एसटी च्या सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणीकपणा; प्रवाशाचे गाडीत सापडलेले पैशाचे पाकीट दिले परत
Post Views: 131
Recent Posts
महाराष्ट्रात महिला असुरक्षित; विधानसभेत गृहमंत्र्यांची धक्कादायक माहिती
March 7, 2026
No Comments
बदलापूरची वाढती लोकसंख्या आणि अपुरी सिव्हर व्यवस्था; पावसाळ्यात पाणी साचण्याची गंभीर समस्या
March 7, 2026
No Comments
बदलापूरचा वेगाने होणारा विस्तार; वाढत्या वसाहतींमध्ये अंतर्गत बससेवेची मागणी तीव्र
March 7, 2026
No Comments
शिस्त, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाची ‘रॉकस्टार’ कामगिरी
March 7, 2026
No Comments
कल्याण–मुरबाड रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; भूसंपादन, मार्गबदल आणि स्थानिक विरोधामुळे काम रखडले
March 6, 2026
No Comments


